Type Here to Get Search Results !

*वरखेडी येथे श्री भैरवनाथ पालखी मिरवणूक*


वरखेडी प्रतिनिधी - 

पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे पौष महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक रविवारी येथील पुरातन काळा पासून प्रचलित सुप्रसिद्ध व परंपरे नुसार चालत आलेल्या सावखेडा येथील मंदिरात तीन मूर्तींच्या स्वरूपात विराजमान असलेले नवसाला पावणारे महादेव,शिवाचा अवतार श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव साजरा मोठ्या श्रद्धेने यात्रा स्वरूपात होत असतो. यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या यात्रा झाल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी श्री भैरवनाथ महाराज यांच्या पालखीचे नियोजन संस्थे मार्फत पंचक्रोशीत चार, पाच गावांमध्ये महाराजांची पालखी मिरवणूक आयोजन करण्यात येते. सदरची पालखी मिरवणूक सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, वरखेडी बुद्रुक, वरखेडी, लासोरा या परिसरातून भक्तीमय उत्साहात काढण्यात येते. पालखीत पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ युवक मंडळ व महिला मंडळ उत्साहाने सहभाग घेऊन पालखीचे दर्शन घेतात. तसेच शेवटच्या सोमवारी सावखेडा मंदिर परिसरात भव्य कुस्त्यांचा दंगल पार पडतो. कुस्ती खेळव्यासाठी आजुबाजूचा परिसर, जिल्ह्यातून , राज्यातून प्रसिद्ध मल्ल ,लहान, मोठे पहेलवान उपस्थिती देऊन बक्षिसे मिळवितात तर कुस्ती शौकीन चित्त थरारक होणाऱ्या कुस्त्यांचा आनंद घेतात.

Post a Comment

0 Comments