Type Here to Get Search Results !

*स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी* *महाराज ३४६ वा राज्याभिषेक दिन पाचोरा येथे उत्साहात साजरा*


दि.१६ जानेवारी शिवपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोरा भडगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पाटील सर यांच्या मार्गदर्शनात झाले. त्यांना मराठा सेवा संघाचे ता. अध्यक्ष राहुल बोरसे व संभाजी ब्रिगेडचे ता. अध्यक्ष जिभाऊ पाटील माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, रविंद्र पाटील यांची मोलाची साथ लाभली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील सोबत मार्केट कमिटीचे सभापती गणेश पाटील व उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, पी. आय.घायाळ साहेब नगरसेवक राहुल गायकवाड, मा.नगरसेवक दत्ता बोरसे, उमेश एरंडे, मराठा सेवा संघाचे एस ए पाटील, जेष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी, किशोर रायसाकडा, नीलेश शेलार, सचिन भोसले, सुधाकर पाटील, जे. व्हि. पाटील, संजय पाटील, विजू जाधव, नितिन पाटील, सचिन पाटील, मनोज पाटील, शरद पाटील, बाबाजी ठाकरे, संजय पाटील सोबत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, उदनराजे समर्थक ग्रुप सह असंख्य शिवशंभू प्रेमी उपस्थित होते.या प्रसंगी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे असा जयघोष करण्यात आला.

या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्मारकात शंभू महाराज यांचा तात्पुरत्या स्वरूपात

 पुतळा लावण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments