Type Here to Get Search Results !

*स्वीकृत नगरसेवक ॲड.अविनाश सुतार यांचा सत्कार*



पाचोरा प्रतिनिधी -

पाचोरा नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झालेले ॲड अविनाश सुतार यांचा पाचोरा आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख आबा सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी ॲड सुतार यांच्या निवड बद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात शाल पुष्प देऊन सन्मान केला.

या वेळी पत्रकार, गौतम सोनवणे, छोटू चौधरी, अशोक चौधरी राकेश सुतार ,अन्वर शेख,भोला पाटील, दिलीप परदेशी, बंडू सोनार, राजकीय पदाधिकारी शिवसेना तालुका प्रमुख विनोद तावडे, हरीभाऊ पाटील, विशाल हटकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments