लोहारा डॉ. जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात शासनाच्या आदेशाने माजी विद्यार्थी संघाची स्थापना आज ९नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.यू डी शेळके मॅडम,माजी मुख्याध्यापक अ अ पटेल सर, उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे सर, पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर ,स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव पाटील, सर्व समिती सदस्य व माजी विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी रमेश अमृतराव देशमुख यांची अध्यक्षपदी,उपाध्यक्षपदी यमुनाबाई गीते,तर कोषाध्यक्षपदी लोहारा शहर वृत्तपत्र पत्रकार मंचचे अध्यक्ष दिपक वामनराव पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.🙏


Post a Comment
0 Comments