केलादेवी मातेच्या आशीर्वादाने प्रचाराची दमदार सुरुवात — पाचोरात भगव्या लाटेचा जल्लोष!
(शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांचा भव्य शुभारंभ कार्यक्रम)
नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनीता किशोर पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित किशोर पाटील यांनी आज केलादेवी मंदिर येथे देवी मातेचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला.
या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उर्जा प्राप्त झाली.
भक्तिभावाने नारळ फोडून देवी चरणी साष्टांग नमस्कार करत पाटील परिवाराने प्रचाराला शुभ प्रारंभ केला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि भगव्या पताकांच्या फडक्यात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणांनी स्वागत करून भगव्या लाटेचा उत्सव साजरा केला.
या वेळी शिवसेना (शिंदे गट), युवा सेना तसेच महिला आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात “शिवसेना जिंदाबाद” च्या घोषणा घुमत होत्या.
सौ. सुनीता किशोर पाटील या पाचोराच्या माजी नगराध्यक्षा असून त्यांच्या कार्यकाळात शहरात अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. याच कामगिरीच्या बळावर त्या पुन्हा मैदानात उतरल्या असून “विकास आणि जनसेवा हा आमचा मुख्य अजेंडा असेल” असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या जोशपूर्ण शुभारंभी कार्यक्रमामुळे पाचोरा शहरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून, शिवसेना (शिंदे गट) चा प्रचार आता अधिक जोमाने सुरू झाला आहे.


Post a Comment
0 Comments