दिनांक : 22/11/2025] – नुकत्याच जाहीर झालेल्या MDS परीक्षेत डॉ. कोमल चौधरी यांनी उल्लेखनीय यश मिळवले. वडील ॲड.नाना त्र्यंबक चौधरी (तळेगांवकर) यांच्या जामनेर येथील राहत्या घरी परिवार तसेच नातेवाईक, मित्रमंडळी, समाजबांधव व शेजारी यांच्या उपस्थितीत जामनेर तालुका तेली समाजाचे तालुका निस्वार्थ समाजसेवक श्री अजय अशोक चौधरी जामनेर तसेच निलेश हरी पाटिल (सर) जामनेर व इतर पदाधिकारी मान्यवर पंचायत समितीचे सदस्य श्री.रमन दादा चौधरी (ओझर), श्री.अशोक दगडू चौधरी (जामनेर),श्री. प्रल्हाद चौधरी (ओझर), श्री. श्रीराम बाबूराव पाटील (ओझर) तसेच नातेवाईक श्री. राजेंद्र बविस्कर सर, श्री. जी. आर. चौधरी सर, श्री. प्रकाश माणिकराव पाटील (गारखेड़ा), श्री संतोष मुरलीधर पाटील (जामनेर), श्री सुनील बावस्कर सर जामनेर श्री. शांताराम चौधरी, (तळेगाव ) श्री. बाळासाहेब मंगळकर, श्री. सुभाष माळी, श्री. खुशाल चौधरी, आशाबाई चौधरी, सौ. जयश्री चौधरी, प्रमिला चौधरी, मामा–मामी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. कोमल चौधरी यांना फुलांचा गुच्छ, शाल–श्रीफळ, ट्रॉफी आणि संताजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. घरभर आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्रपरिवार व शेजाऱ्यांनी भेट देऊन अभिनंदनांचा वर्षाव केला.
सत्काराला उपस्थित असलेल्या वडील नाना चौधरी व आई सुरेखा चौधरी तसेच गुरुजन, स्व. आजोबा शास्त्री बाबा व आजी यांच्या आशीर्वादाने आणि मिळालेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे भक्कम पाठबळ मिळाल्यामुळेच हे यश शक्य झाले, असे डॉ. कोमल यांनी सांगितले.
या यशामुळे आगामी काळात त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कारकिर्दीला नवे आयाम प्राप्त होतील आणि समाजसेवेतून त्यांचे योगदान अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment
0 Comments