पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किशोरआप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था, आणि द युनिक अकॅडमी शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २ नोव्हें. रोजी सकाळी ११ वाजता व्यापारी भवन, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पार पडणार आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिस असून
प्रथम क्रमांक ₹11,000, द्वितीय ₹7,100, तृतीय ₹5,100, चतुर्थ ₹3,100 आणि पाचवा क्रमांक ₹1,100 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97 या लिंकचा वापर करावा. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ८९२९७२८४१८ उपलब्ध आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सोबत पॅड, पेन आणि कोरे पृष्ठ आणणे आवश्यक आहे. विद्यार्थी,ज्ञानप्रेमींनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


Post a Comment
0 Comments