Type Here to Get Search Results !

आ. किशोरआप्पा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य निर्धार मेळावा

शिवसेनेचे कार्यासम्राट, लोकप्रिय आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या १ नोव्हेंबर रोजी भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्याचा संकल्प करण्यात येणार असून, येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असणार आहे, हे देखील जाहीर होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

या वेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, गणेश पाटील, उप जिल्हा प्रमुख किशोर बारवकर, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील , भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, स्विय्य सहाय्यक राजेश पाटील,विकास पाटील, भैय्यासाहेब पाटील, विनोद तावडे, सुमित सावंत, राजेंद्र पाटील, सुधाकर पाटील, अरुण पाटील, प्रवीण पाटील, बंडू सोनार भुवनेश दुसाने आदी उपस्थित होते.

बैठकीला मार्गदर्शन

बैठकीदरम्यान रावसाहेब पाटील, प्रवीण ब्राह्मणे, विकास पाटील आणि अरुण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे, संघटन मजबूत करण्याचे आणि पक्षवाढीसाठी एकदिलाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

जनतेशी थेट संवाद - संपर्क

कार्यक्रमात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा आढावा, शिवसैनिकांचा सत्कार, तसेच जनतेशी थेट संवाद यांचाही समावेश आहे. संपूर्ण शहर भगव्या झेंड्यांनी सजवले जाणार असून, शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमणार आहे.

मेळाव्या नंतर राजकीय वातावरण तापणार

या मेळाव्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचा भगवा पुन्हा उंच फडकवण्यासाठी होणारा हा निर्धार मेळावा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.



Post a Comment

0 Comments