Type Here to Get Search Results !

पाचोरा येथे दैनिक प्रहार जिल्हा बैठक संपन्न

पाचोरा येथे राणे प्रकाशन प्रा.लि. दैनिक प्रहार वृत्त पत्राची जिल्हा स्तरीय बैठक भडगावरोड वरील *हॉटेल स्वा डिश* येथे उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ श्री.जमीलशेख , नाशिक विभाग संपादक धनंजय बोडके, जळगाव जिल्हा ब्युरो चीफ आबा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पार पडली. 

बैठकीत येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यात दैनिक प्रहार वृत्तपत्राची लवकरच सुरुवात, प्रतिनिधी नियुक्ती आणि अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कदम चाळीसगाव, अभिजित आढाव भुसावळ, विश्वास पाटील पारोळा, शब्बीर शेख यावल, डॉ.बी.बी.भोसले भडगाव, दिग्विजय सूर्यवंशी जामनेर, शेंदुर्णी, शकिल शेख रावेर, विश्वास वाडे चोपडा, विजय कुमार शुक्ल धरणगाव, रतीलाल पाटील एरंडोल,अशोक चौधरी पाचोरा ग्रामीण आदींची प्रत्यक्ष आणि काही प्रतिनिधींची ऑनलाइन उपस्थिती होती. 

बैठकीचे आयोजक पाचोरा प्रतिनिधी लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments