एक पेड मा के नाम उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा 
पाचोरा तालुक्यातील१० शाळांचा झाला सन्मान
पाचोरा -" एक पेड मा र्के नाम" केंद्र शासनाच्या या उपक्रमाला पाचोरा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शालेय विद्यार्थ्यांनी सुमारे १२६८८रोपांची लागवड अभियानात केली. २४० शाळांनी इको क्लबची स्थापना शालेय पातळीवर केली आहे. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक पेड मा के नाम उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दहा शाळांचा सन्मान केला.
" एक पेड मा के नाम " हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम,मातृप्रेम, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीची जाणीव या उपक्रमातून होईल असे गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शा.पो. अधीक्षक सरोज गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील,केंद्र प्रमुख शांताराम वानखेडे, अभिजित खैरनार, संगणक प्रोग्रामर योगेश अहिरराव, विषय तज्ञ गिरीश भोयर, सुनील शिवदे उपस्थित होते. *वृक्षारोपण करणाऱ्या शाळा*
पी.के.शिंदे विद्यालय १०३५,एस.पी. शिंदे विद्यालय पाचोरा ७१५,जी.एस. हायस्कूल ७०३,
सु.भा.प्राथ पाचोरा ४५३,न्यू इंग्लिश मिडीयम ३८२,
सिंधुताई शिंदे विद्यालय ३२९,
ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरे ३२७, खाजगी प्राथ. नगर देवळा २९८,
माध्य.विद्यालय शिंदाड २५९ जि.प.शाळा वरखेडी २४७. अशा विविध शाळांनी अभियान राबविले.

Post a Comment
0 Comments