Type Here to Get Search Results !

पाचोरा–भडगाव मतदार संघात यावेळी 100% भगवा फडकणार.


 पाचोरा–भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकांपूर्वी जोरदार राजकीय संदेश देत घोषणा केली आहे की पाचोरा–भडगाव मतदार संघात यावेळी 100% भगवा फडकणार...

1 नोव्हेंबर रोजी आमदार किशोरआप्पा पाटील यांचा  वाढदिवस असून त्यानिमित्ताने मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनी आणि जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावर्षी वाढदिवस आमदारांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे कारण तो राजकीय विजयाचा निर्धाराचा प्रारंभ ठरणार आहे...

वाढदिवस नाही निर्धाराचा मेळावा वाढदिवसानिमित्त पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात दोन्ही तालुक्यातील 

🏛️ नगरपालिका 
🏫 जिल्हा परिषद 
🧾 पंचायत समिती 
सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा शपथ विधी घेतला जाणार आहे...


🗣️आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आत्मविश्वासपूर्ण संदेश...

मी माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या आशीर्वादावर सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे मतदारसंघातील जनतेने ढोल ताशांच्या गजरात मेळाव्यात सहभागी व्हावे आणि भगवा पुन्हा फडकविण्याच्या निर्धार आला साथ द्यावी...


शुभेच्छांचा वर्षाव आणि नेत्यांची उपस्थिती...

या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील बाजार समिती सभापती गणेश पाटील माजी संचालक राजेंद्र पाटील भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी प्रवीण ब्राह्मणे आणि स्वीय सहायक राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते...






Post a Comment

0 Comments