
रविवारी दिनांक.27/07/2025 रोजी दुपारी 12 वाजता स्टार पॅलेस हॉटेल नवीन बस स्टॅण्ड जवळ,जळगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत समाजाच्या भविष्यातील वाटचालीवर आणि एकजुटीवर चर्चा करण्यात आलीकार्यक्रमाची सुरुवात संत जगनाडे महाराज यांच्या मुर्तीला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी समाजबांधवांशी संवाद साधत,समाजाच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले या बैठकीला स्थानिक पंचमंडळ 350 व महासंघाचे पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.
भविष्यात राज्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली ही राज्य परिषद समाजाच्या परिवर्तनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व्यासपीठ ठरेल जुन्या रूढी आणि परंपराकडे लक्ष देऊन त्यात काळानुरूप बदल घडवण्यावर भर दिला जाईल.आगामी राज्य परिषदेमध्ये विविध भागातील 1 लाखाहून अधिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थिती राहतील अशी अपेक्षा आहे.
यावेळी महासंघाचे जळगाव जिल्ह्यातील तालूकाध्यक्षांचा व पंचमंडळ अध्यक्षांचा विजय चौधरी व दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला जळगाव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी,उपाध्यक्ष विनोद चौधरी, ॲड.वसंत भोलाणे,सेवा आघाडी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बी.एम.चौधरी,नंदू चौधरी,सिताराम देवरे,अनिल चौधरी,अशोक चौधरी,प्रशांत शिंदे,प्रशांत,सुरळकर,शामकांत चौधरी,अशोक नामदेव चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रामदास चौधरी पाटील व आभार प्रदर्शन अशोक नामदेव चौधरी यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवक मंडळाचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments