Type Here to Get Search Results !

श्री अतुल संघवी व व्हाईस चेअरमन श्री प्रशांत अग्रवाल यांचे पत्रकार परिषद मध्ये भूमिका

 पाचोरा पीपल बँकेचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करणार तसेच सभासदांना न्याय देण्यासाठी सहकार्य करा चेअरमन श्री अतुल संघवी व व्हाईस चेअरमन श्री प्रशांत अग्रवाल यांचे पत्रकार परिषद मध्ये भूमिका

बॅंकेचे जाळे महाराष्ट्र भर पसरविण्या सोबतच डिजीटलाजेशनच्या माध्यमातून बॅंक यशोशिखरावर पोहचविण्याचा नविन संचालक मंडळाचा मानस असणार आहे. सर्व प्रथम तालुक्यातील मोठी बाजार पेठ असलेल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथे नविन शाखा उघडण्यात येणार आहे. यासोबतच यु. पी. आय. कोड ॲक्टीव्हेशन करण्याचे काम देखील प्रगती पथावर आहे. काही विघ्नसंतोषी व्यक्तींमुळे निवडणूक लागली यात बॅंकेचे २० लाखापर्यंत भुर्दंड निवडणूकीच्या माध्यमातून बॅंकेला सोसावा लागला. विरोधी उमेदवारास मतदारांनी त्यांची जागा दाखवुन दिली असुन नव नियुक्त संचालक मंडळावर पुन्हा एकदा सभासदांनी विश्वास ठेवला आहे. अशी माहिती संचालक अतुल संघवी यांनी दि. पाचोरा पिपल्स को. ऑप बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

      नुकतीच दि. पाचोरा पिपल्स ऑप बॅंकेची निवडणूक संपन्न झाली. एकीकडे सहकार पॅनेलचे ९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर दुसरीकडे एक विरोधी उमेदवार हे एकमेवच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात विरोधी उमेदवार चा पराभव झाला असुन सहकार पॅनेलचे १५ संचालक निवडुन आले आहेत. १६ जुलै रोजी माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक अॅड. अतुल संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सभासद मतदारांचे आभार व्यक्त करत निवडणूक काळात विरोधक उमेदवारास खोट्या माहित्या पुरवत मतदारांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवुन दिली आहे. याप्रसंगी संचालक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments