श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था, जामनेर तालुका यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवार, दिनांक 27 जुलै 2025 रोजी जामनेर शहरात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण व यशस्वी झालेल्या तेली समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपली मार्कशीटची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि मोबाईल नंबर दिनांक 21 जुलै 2025 पर्यंत संस्थेकडे लवकरात लवकर जमा करावेत,असे विनम्र आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
- श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था, जामनेर तालुका


Post a Comment
0 Comments