पाचोरा तालुक्यातील बाळद येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या,कारण गुलदस्त्यात
बाळद बु प्रतिनिधी ता पाचोरा येथील समाधान बालु पाटील यांनी आज दि.७ रोजी सकाळी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास पाच पुल शिवारात झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली सविस्तर वृत्त असे की समाधान बालू पाटील हा मुलगा पुण्याला फिनोलेक्स कंपनीमध्ये अभियंता या पदावर नोकरीसाठी कार्यरत होता त्याने पुण्याहून परस्पर येऊन स्वतःच्या शेतात आत्महत्या केली याची कुठलीही कल्पना घरच्या लोकांना नव्हती असे त्यांनी का केले याची सर्व माहिती अजून गुलदस्त्यात असून त्याचे पंचनामे करून त्याचे शव पोस्टमार्टम साठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयाकडे कडे रवाना करण्यात आले पुढील तपास पाचोरा पोलीस प्रशासनामार्फत केला जाणार आहे त्याच्या पश्चात आई-वडील व एक मोठा भाऊ असून अचानक घडलेला प्रकार पाहून त्यांनी जीवाचा एकच अंकात केला अतिशय गरीब परिस्थितीतून शिकून नोकरीला लागला घडलेला प्रकारामुळे गावात शोककळा पसरली आहे

Post a Comment
0 Comments