फुले,आंबेडकर,शाहू पारितोषिक साठी मंडळाची निवड
अजय चौधरी,जामनेर तालुका.अध्यक्ष- खान्देश तेली समाज मंडळाचे समाजासाठी व इतर समाजासाठी असलेले योगदान व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असल्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली असून २०२३-२४ वर्षीच्या फुले,आंबेडकर,शाहू पारितोषिक साठी महाराष्ट्र शासनाने खान्देश तेली समाज मंडळाची राज्यपातळीवर
निवड केलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विकास विभागाकडून दरवर्षी सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या विविध संस्थांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. २०२३-२४ यावर्षीच्या या पारितोषिकासाठी खान्देश तेली समाज मंडळाची निवड झाल्याचे पत्र प्रसारित झाले असून मंगळवार दिनांक १० रोजी सकाळी १० वाजता मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,सामाजिक न्याय विकास मंत्री संजय शिरसाठ,खासदार अरविंद सावंत,सामाजिक न्याय विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवरांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकारींना सदरचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाची तारीख व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल असे सामाजिक न्याय विकास विभाग कडून कळवण्यात आलेले आहे.शासनाने जाहीर केलेल्या या सन्मानाबद्दल मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी शासनाचे आभार व्यक्त केले असून,खान्देश तेली समाज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद उत्सवाचे वातावरण आहे.

Post a Comment
0 Comments