Type Here to Get Search Results !

समाजातील प्रत्येक घटक पुरस्काराचा खरा मानकरी - रविंद्र चौधरी

खान्देश मंडळाला मिळालेला पुरस्कार संताजी चरणी अर्पण - कैलास चौधरी

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्यायविकास विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.त्यामध्ये खान्देश तेली समाज मंडळाला शाहू,फुले, आंबेडकर पुरस्कार देऊन यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई या ठिकाणी सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सामाजिक न्याय विकास मंत्री संजय शिरसाठ,रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले,जलसंधारण मंत्री संजय राठोड,आमदार संजय बांगर,सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त प्रवीण पुरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

खान्देश तेली समाज मंडळाचे वतीने अध्यक्ष कैलास आधार चौधरी,सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,संजय शिरसाठ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी अध्यक्ष व सचिव दोघांना सन्मानपूर्वक सन्मान चिन्ह,पुष्पगुच्छ,देऊन गौरवण्यात आले.पुरस्कार स्वीकारतांना सभागृहामध्ये संताजी महाराजांच्या नावाने सर्व पदाधिकारींनी जयघोष करीत आनंद साजरा केला.

पुरस्कार वितरण समारंभासाठी धुळे शहरासह आनंदखेडे,कुसुंबा,नेर,
लोणखेडी,चाळीसगाव,
अमळनेर,शिरपूर, जामनेर,गारखेडा,शेंदुर्णी,
नाशिक,कल्याण,ठाणे आदी परिसरातून खान्देश तेली समाजाचे पदाधिकारी हजर होते.त्यामध्ये धुळे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी,उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी,धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,जळगाव जिल्हा अध्यक्ष सोनू भटू चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष किरण श्रीराम बागुल,उपाध्यक्ष किशोर पुंडलिक चौधरी,चंद्रकांत श्रीराम चौधरी, चोपडा तालुका अध्यक्ष प्रकाश शंकर चौधरी, धुळे तालुका अध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी,साक्री तालुका अध्यक्ष युवराज पंढरीनाथ महाले,जामनेर तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी,शेंदुर्णी अध्यक्ष सोपान पांडुरंग चौधरी,जामनेर शहराध्यक्ष निलेश रमेश चौधरी,अमोल हिरामण चौधरी,गजेंद्र फुलचंद चौधरी,दीपक नवल चौधरी सर,भाऊसाहेब चौधरी वरखेडी,राजेंद्र गणपत चौधरी,सुनील दिलीप चौधरी नेर,योगेश गुलाबराव चौधरी लोणखेडी,जिभाऊ मंगा चौधरी आनंदखेडे,भगवान पांडुरंग चौधरी चाळीसगाव, चैतन्य मनोज चौधरी अमळनेर,अतुल सुरेश वाघ,छोटू रामदास चौधरी,अरुण भगवान चौधरी,वासुदेव सोपान चौधरी जामनेर,रवींद्र वसंत चौधरी,कमलेश सुरेश पाटील गारखेडा,योगेश टाहकले जामनेर यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाज बांधव समारंभ स्थळी उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी नियमित सहकार्य करणारे सर्व देणगीदार मान्यवर समाजसेवक बंधू भगिनी पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांचे तसेच जोगाई ग्रुपचे अध्यक्ष श्री योगेश दादा पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments