Type Here to Get Search Results !

मुंबई येथे खान्देश तेली समाज मंडळाला “शाहू-फुले-आंबेडकर” पुरस्काराने सन्मान | जामनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचाही गौरव

अजय चौधरी जामनेर तालुका अध्यक्ष....
मुंबई | यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला “शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा” 
आयोजित करण्यात आला.


या गौरवसोहळ्यात *श्री कैलासदादा चौधरी आणि सचिव रवींद्रदादा चौधरी* यांच्या विशेष पुढाकारामुळे *जामनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले* ही बाब तालुक्यासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानास्पद ठरली.

 *पुरस्कारप्राप्त जामनेर तालुक्यातील पदाधिकारी:*

🔹 *तालुका अध्यक्ष – अजय अशोक चौधरी, जामनेर*
🔹 *उपाध्यक्ष – सोपान पांडुरंग चौधरी, शेंदुर्णी*
🔹 *निलेश रमेश चौधरी, जामनेर*
🔹 *वासुदेव सोपान चौधरी, जामनेर*
🔹 *कमलेश सुरेश पाटील, गारखेडा*

या पुरस्कारामुळे संपूर्ण *जळगाव जिल्हा आणि जामनेर तालुक्यात* उत्साहाचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.

या वेळी *तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी* यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, *खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलासदादा चौधरी, सचिव रवींद्रदादा चौधरी*, तसेच *जयवंत दादा चौधरी, राजेंद्र चौधरी, भटू चौधरी, प्रकाशदादा चौधरी आणि किशोरभाऊ चौधरी* यांचे मन:पूर्वक आभार मानले.

हा गौरव फक्त वैयक्तिक नसून संपूर्ण तेली समाजाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे. यामुळे संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे










Post a Comment

0 Comments