Type Here to Get Search Results !

✨ जामनेर तालुक्यात गौरवाचा क्षण ✨ ईश्वर भाऊ चौधरी यांचा भव्य सत्कार संपन्न

अजय चौधरी जामनेर तालुका अध्यक्ष..
संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था, जामनेर तालुका यांच्या वतीने तालुका कार्याध्यक्षपदी नुकतेच निवड झालेले ईश्वर भाऊ चौधरी यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून भव्य सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ आपल्या तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी महाराज यांची प्रतिमा देण्यात आली 

सत्कारप्रसंगी बोलताना ईश्वर भाऊ चौधरी यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मार्गदर्शकांचे व समाजबांधवांचे मन:पूर्वक आभार मानले व सांगितले की –
"संस्थेने दाखवलेला विश्वास मी कायम राखीन आणि समाजहितासाठी झपाटून काम करीन."

हा सत्कार सोहळा सामाजिक ऐक्याचा आणि प्रेरणादायी कार्याचा एक उत्कृष्ट नमुना ठरला.
 जय संताजी!








Post a Comment

0 Comments