'व्हाईस ऑफ मीडिया' या पत्रकार संघटनेच्या शिर्डी येथे होणाऱ्या दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारांचा जत्था उत्साहात रवाना झाला आहे.
आजपासून पुढील दोन दिवस शिर्डी येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, राज्यभरातील पत्रकार या अधिवेशनात सहभागी होत आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, पत्रकारांची सुरक्षितता, आणि समाजातील भूमिका या विषयांवर अभ्यासपूर्ण कार्यशाळा व सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अधिवेशनात पत्रकारांनी आपल्या अनुभवांची देवाण-घेवाण करताना पत्रकारिता क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी संयुक्त विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न होणार आहे.
दोन दिवसांच्या या अधिवेशनातून पत्रकारांना नव्या दिशा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments