विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नॉन क्रिमीलेअरची मर्यादा आठ लाखावरून पंधरा लाख वाढविण्यात यावी तसेच मुलींना सर्वच क्षेत्रांमध्ये सरसकट मोफत शिक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री महोदय यांना धुळे शहरातील आमदार श्री अनुपभैय्या अग्रवाल यांचे मार्फत आज खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने देण्यात आले.निवडणुकीमध्ये महायुतीकडून नॉन क्रिमीलेअरची मर्यादा आठ लाखावरून पंधरा लाख करण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते.त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल तसेच महायुतीचे सरकार असतांना मुलींना मोफत शिक्षणाचे आदेश दिलेले आहेत.मात्र,काही क्षेत्रांमध्ये मुलींना मोफत शिक्षण दिले देत नाही *उदाहरणार्थ प्यारामेडिकल* तरी सर्वच क्षेत्रांमध्ये मुलींना सरसकट मोफत शिक्षण देण्यात यावे अशा मागणींचे निवेदन धुळे शहरातील आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांना देऊन त्यांच्याशी सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,सचिव रवींद्र जयराम चौधरी,धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,किशोर पुंडलिक चौधरी,गजानन एकनाथ चौधरी,मनोज शांताराम चौधरी,राजेंद्र भाईदास चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments