Type Here to Get Search Results !

वरखेडी ता.पाचोरा येथील 4 भावंडांची देशसेवेसाठी निवड

वरखेडी ता.पाचोरा येथील चौधरी समाजातील एकाच कुटुंबातील 3 भाऊ व 1 बहीण यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात निवड झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

वरखेडी येथील तेली समाजातील शेतकरी,व्यावसायिक कुटुंबातील श्री.ज्ञानेश्वर पांडुरंग चौधरी यांचे परिवारातील 3 भाऊ व 1 बहीण यांनी अथक परिश्रमातून शिक्षण पुर्ण करुन मनात देश सेवेची इच्छा बाळगुन कठीण सराव करत भारतीय सैन्य दलात यशस्वी निवड झाली असून निवड झालेल्यांमध्ये.1) रोहित ज्ञानेश्वर चौधरी (आसाम रायफल), 2) योगेश ज्ञानेश्वर चौधरी (इंडीयन नेव्ही एस.एस.आर) 3) आशिष संजय चौधरी (इंडीयन नेव्ही एस.एस.आर) 4) पल्लवी संजय चौधरी (आय.टी.बी.पी) यांचा समावेश असून त्यांचे ह्या देशसेवेच्या धाडसाबद्दल त्यांचे गावातून,तालुक्यातून त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहेत त्यांचे जळगाव जिल्हा तेली समाज अध्यक्ष.सुरेश अण्णा चौधरी सचिव.नारायण दयाराम चौधरी व पाचोरा तालुका तेली समाज अध्यक्ष.भोला आप्पा चौधरी व जिल्हा शिक्षण मंडळ विश्वस्त पाचोरा तालुका तेली समाज पंच मंडळ पाचोरा शहर तेली समाज पंच मंडळ वरखेडी तेली समाज पंच मंडळ युवक मंडळ सर्व ग्रामस्थ यांच्या तर्फे आणि गावातील सर्व समाज बांधवांन तर्फे व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य वी.का.सोसायटी चेअरमन व सदस्य यांनी अभिनंदन केलेह्याद्री 24 तास तर्फे त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments