Type Here to Get Search Results !

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सवात साजरी करण्यात आली वरखेडी ता.पाचोरा














आज दि.8 डिसेंबर 2024 रोजी वरखेडी ता.पाचोरा जि.जळगाव येथे श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने,आनंदाने साजरी करण्यात आली. संताजीच्या प्रतिमेची पुजा कुऱ्हाड खु. ता.पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते, सर्व गोर गरिबांच्या मदतीला नेहमी तत्पर असणारे श्री.जगदिशभाऊ तेली यांच्या हस्ते करण्यात आली. श्री.जगदिशभाऊ तेली यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आपले विचार मांडले.
यावेळेस समाजातील सर्व महिला व समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी रित्या उत्सव साजरा करण्यासाठी तेली समाज अध्यक्ष, पंच मंडळ व समाजातील सर्व समाजबांधवांनी महिला वर्गानी युवक मंडळाने सहकार्य करून सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Post a Comment

0 Comments