
पाचोरा तेली समाजातील तरुणीचे एमपीएससी परीक्षेत यश तेली समाजा मार्फत झाला सन्मान पाचोरा येथील तेली समाजातील स्वर्गीय प्रताप महादू चौधरी यांची नात व स्वर्गीय रवींद्र प्रताप चौधरी यांची कन्या तसेच दिनेश रवींद्र चौधरी यांची भगिनी कु. योगिता रवींद्र चौधरी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मंत्रालयीन महसूल सहाय्यक तथा नंदुरबार जिल्हा परिषद येथे कनिष्ठ सहाय्यक या पदांवर निवड झाल्याबद्दल पाचोरा तेली समाज व महिला मंडळातर्फे, कु़ योगिता चौधरी हीस सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम बाहेरपुरा भागातील समाजकार्यालयात आयोजित करण्यात आला होता लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अत्यंत विपरीत परिस्थितीत अभ्यास करून योगिताताई यांनी हे यश प्राप्त केल्याबद्दल त्यांना पाचोरा तेली समाज महिला मंडळ पदाधिकारी सौ रेखा बापूराव चौधरी सीमा न्यानेश्वर चौधरी सुनिता प्रकाश चौधरी मनीषा नारायण चौधरी ललिता संदीप चौधरी मंगलाबाई अशोक चौधरी बेबाबाई भागवत चौधरी उषाबाई मधुकर चौधरी जनाबाई शिवाजी चौधरी गोजरबाई प्रल्हाद चौधरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी तेली समाज अध्यक्ष अध्यक्ष नारायण चौधरी सचिव शांताराम चौधरी सर सहसचिव शरद चौधरी मा नगरसेवक प्रकाश जिभाऊ चौधरी माजी नगरसेवक बंडूभाऊ चौधरी जेष्ट पत्रकार प्राध्यापक सी एन चौधरी दिनकर चौधरी गोपाल चौधरी संजय चौधरी पंडित चौधरी रामदास लोटन चौधरी बापू सदाशिव चौधरी बापू विजय चौधरी किरण प्रल्हाद चौधरी दत्तात्रय ओंकार चौधरी शांताराम दयाराम चौधरी यांचे सह समाज बांधव व महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित देऊन शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी तेली समाजाचे सचिव शांताराम चौधरी सर यांनी योगिता ताईचा परिचय करून समायोजित भाषण केले. त्यानंतर योगिताताईंनी सर्व उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिव शांताराम चौधरी सर यांनी केले तर आभार सहसचिव शरद चौधरी यांनी मानले यावेळी समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments