Type Here to Get Search Results !

जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे 400 गुणवंतांचा गौरव

 











जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ४०० गुणवंतांचा गौरव


जळगांव:- येथील जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे १० वी, १२वी, पदवी, पदविका व अन्य परीक्षेत उत्तीर्ण ४०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार, दि. १५ रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष, भाजपा प्रदेश महामंत्री, विजय चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजुमामा भोळे यांच्या उपस्थिती पार पडला.

     मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वललाने कार्यक्रम सुरू झाला. यावेळी व्यासपीठावर जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेशआण्णा चौधरी, सचिव नारायण चौधरी, सुरेश सिताराम चौधरी, राजेंद्र चौधरी, संतोष चौधरी, वामन चौधरी, सतीश चौधरी, चंद्रकांत चौधरी, पुंडलिक जावरे, मा. नगरसेविका मंगला चौधरी, शोभा चौधरी, निर्मला चौधरी, प्रल्हाद चौधरी, अमळनेरचे माजी नगराध्यक्ष, सुभाष चौधरी, भोलाआप्पा चौधरी, अशोक चौधरी, शांताराम चौधरी, विजय चौधरी, भास्कर चौधरी, अनिल चौधरी, डी. ओ. चौधरी, दत्तात्रय चौधरी, नंदू चौधरी, आनंदा चौधरी, बी. एम. चौधरी, गणेश चौधरी, प्रताप चौधरी, डॉ. मणिलाल चौधरी, पवार गुरुजी, बाळासाहेब चौधरी यांचेसह अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

       यावेळी १० वी, १२ वी, पदवी, पदविका व अन्य परीक्षेत उत्तीर्ण ४०० विद्यार्थ्यांना भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी व मान्यवरांच्या हस्ते शालेय बॅग, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

      याप्रसंगी विजय चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणाची वाटचाल याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले, आ. राजू मामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा करणे व नेहमी सत्य गोष्टीच्या बाजूने उभे राहणे याबद्दल सांगितले तसेच, कु. अमृता चौधरी हिने मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी विविध खेळ तसेच स्किल डेव्हलपमेंट, संशोधन या क्षेत्रातही पुढे यावे असे विचार मांडले. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव नारायण चौधरी यांनी सूत्रसंचालन लोटन चौधरी व शांताराम चौधरी यांनी तर आभार देवेंद्र गांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दुर्गेश चौधरी, मनोज चौधरी, दर्पण चौधरी, राहुल चौधरी यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments