Type Here to Get Search Results !

*कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याचे महसूल प्रशासनाला निवेदन*




*आबा सूर्यवंशी* 

पाचोरा -

महाराष्ट्र राज्य सरकारने जाहिर केलेल्या महाराणी अहिल्याबाई होळकर २०२६ ची कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या बद्दल राज्यसरकारचे शेतकरी वर्गाने स्वागत करून आभार व्यक्त करीत आहे .या योजनांतर्गत ३० सप्टेंबर २०२६ थकीत असलेल्या पिक कर्जावर मुद्दल व्याज सह दोन लाख रुपयांची कर्जमाफी करण्याची तरतूद करण्यात आली आहे.सोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयां पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. या साठी आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये कर्ज माफी बाबत कोणताही सम्रभ होणार नाही. तसेच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा यात त्यांच्या नावाचा समावेश झालेला आहे की नाही ही माहिती मिळावी यासाठी शासनानेकर्ज माफ शेतकऱ्यांच्या गाव निहाय याद्या प्रसिद्ध कराव्या.संबंधित याद्या ग्राम पंचायत , चावडी, सोसायटी कार्यालयात उपलब्ध करून द्याव्या.शेतकऱ्यांना सोयिस्कर व्हाव्या म्हणून कर्ज माफीच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करून देण्यात याव्या.पारदर्शकता राखण्यासाठी अधिकृत शासकीय वेब साईट वर याद्या प्रसिद्ध करण्यात याव्या अशा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे आणि पाचोरा तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात माजी बांब रूड कुरुंगी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य पदमबापू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, शेतकरी विजय पोपट पाटील विकास सोसायटी चेअरमन वेरूळी, हेमराज ठाणसिंग पाटील माजी सरपंच मोहाडी, संतोष शिवाजी पाटील, राजू नारायण चौधरी, रोहित कैलास पाटील आसनखेडा यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments