*आबा सूर्यवंशी*
जळगाव /पाचोरा -
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी आज दि. ६ मार्च रोजी पाचोरा मतदार संघात विविध विकास कामे आणि पाचोरा रेल्वे स्टेशनवर केंद्राच्या अमृत महोत्सव योजनांतर्गत सुरू असलेल्या आणि झालेल्या विकास कामांची पाहणी केली. तसेच ग्रामीण भागात आणि पाचोरा शहरात काही ठिकाणी भेट देऊन लोकांच्या आणि पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्या अडीअडचणी, समस्या , मागण्यां बाबत चर्चा केली. या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पंचायत समिती माजी सभापती बन्सीलाल पाटील,माजी नगरसेविका सौ. सुचेतातताई दिलीप वाघ, माजी शहराध्यक्ष नंदू बापू सोमवंशी, रमेश वाणी,कांतिलाल जैन, दिपक माने, जगदीश पाटील, प्रवाशी संघटनांचे पदाधिकारी, भुसावळ डीआरएम विभागांचे अधिकारी, स्टेशन मास्तर आदी उपस्थित होते.
खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचे पाचोरा भेटी दरम्यान त्यांनी साडे अकरा ते बारा वाजे दरम्यान केंद्रीय निधीतून अमृत महोत्सव योजनेच्या अंतर्गत पाचोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे हद्दीत पश्चिम भागात नव्याने बांधण्यात आलेले तिकीट आणि रिझर्व्हेशन ऑफिस, स्थानकावर प्रवाशांसाठी उभारलेले शेड, पिण्याच्या पाण्याची सोय, समस्या, स्वच्छता, पार्किंग नवीन विस्तारित प्लेटफॉर्म वर प्रवाश्यांना आवश्यक असलेल्या सुविधा, बाबत पाहणी केली.सद्य स्थितीला रेल्वे स्थानकावर असलेलेले प्रवाशी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी असलेले जिने ( दादरे) पुरेसे असले तरी पाचोरा शहर हे भडगावरोड भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या भागातील प्रवाश्यांना कोर्ट कडचा रस्ता हा सोयिस्कर असल्याने प्रवाश्यांना रेल्वे प्लॅटफॉर्म वर जाणे, येण्यासाठी गो. से.हायस्कूलच्या गेट समोरील रेल्वे हद्दीतील रस्त्यावर रेल्वे प्रशासनाने प्रवाशी सुविधा आणि भविष्यातील काळाची गरज ओळखून नवीन जिना (दादरा) बांधावा अशी मागणी खासदारांकडे करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्टेशन वर दोन्ही बाजूचे प्लॅटफॉर्म लांबी वाढविण्यात आली असल्याने रेल्वे इंजिन पासून ते शेवटच्या बोगी पर्यंत जाताना प्रवाशांची, जेष्ठ महिला, पुरुष लेकुरवाळ्या महिलांची, अपंग नागरिकांची, लहान मुलं आणि समान सह बोगीत चढताना प्रचंड धावपळ आणि तारांबळ होत असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हितासाठी प्लॅटफॉर्म वर आवश्यक अशी उपाययोजना करावी. तसेच दैनंदिन नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी , बाहेरगावी प्रवासासाठी महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे वाढविण्याची प्रलंबित मागणी मार्गी लावावी. सकाळचा महाराष्ट्र एक्सप्रेस ची बदल केलेली वेळ आणि बंद केलेली देवळाली भुसावळ पसेंजर गाडी पुन्हा तत्काळ पुर्ववत वेळे नुसार सुरू करावी जेणे करून ग्रामीण भागातून आणि शहरातून भुसावळ, नाशिक भागात जाणाऱ्या प्रवाशांची गैर सोय आणि धावपळ थांबेल. पुणे भागात जाण्यासाठी आणि तेथून येण्यासाठी एक्सप्रेस ,जादा गाड्या नसल्याने उदना - पुणे एक्सप्रेस सुरू करावा . अशी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आणि प्रवाशी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीमती वाघ यांचे कडे मागणी केली केली आहे. .
---------------------
खासदार स्मिता ताई यांची दैनिक प्रहार ने प्रवाशी मागण्या, सोय, सुविधा, अडीअडचणी बाबत माहिती घेतली असता त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मतदार संघाच्या सर्वांगीण विकासा सोबत जनतेला रेल्वे स्थानकावर महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, अन्य मागण्या मार्गी लावण्यासाठी मी रेल्वे मंत्री, रेल्वे भवन यांचे कडे पाठपुरावा करीत असते. काही मागण्या मार्गी लागल्या असल्यातरी उर्वरित समस्या आणि मागण्या मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस ची वेळ आणि देवळाली भुसावळ पेसेंजर पूर्ववत करण्यासाठी आणि पुणे - उदना एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. वयस्कर अबाल जेष्ठ नागरिक यांचे सोई साठी नवीन चार लिफ्ट सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला तिकीट विक्री आणि रिझर्व्हेशन सुविधा सुरू ठेवण्याचे आणि नवीन रेल्वे तिकीट ऑफिस समोरील रोड वरील प्रवाश्यांना अडचण निर्माण करणारे अतिक्रमण काढण्याचे नगर पालिकेला आदेश दिले आहे .
*मालधक्का पाचोऱ्यातच*
महत्वाचे म्हणजे जुना रेल्वे माल धक्का हा अन्यत्र स्थलांतरित केल्याच्या अपूर्ण माहितीच्या वावड्या पूर्णतः खोट्या आणि राजकीय प्रेरित आहे. असा कोणताच निर्णय झालेला नाही. रेल्वे मालधक्का पाचोऱ्यातच राहणार आहे अन्य ठिकाणी जाऊ देणार नाही. जुना मालधक्का हा पीजे रेल्वेच्या जुन्या लोकोशेड भागात स्थलांतरित करण्यात आला असून त्याच्या बांधकामांची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या मी आजाराने पीडित असली तरी घरी बसून आराम न करता जनसेवेसाठी मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात माझे दौरे आणि जनहिताची कामे करणे आणि जनता, शेतकरी, सर्व स्तरातील अडीअडचणी समस्या मार्गी लावणे मी माझे कर्तव्य समजते.!


Post a Comment
0 Comments