Type Here to Get Search Results !

*आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा गौरव सोहळा*


   *अशोक चौधरी* तांदुळवाडी ता. भडगाव येथील कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने पत्रकार दिनी दि.६ जानेवारी मंगळवार रोजी सकाळी १० वाजता पत्रकार संघाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रतिलाल पाटील गोंडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय किटवाटप समारंभ आयोजित केलेला आहे. 

  संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दरवर्षी पत्रकारांच्या माध्यमातून अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना पाचोरा व भडगाव तालुक्यातील सन्मानित व्यक्तींच्या माध्यमातून शालेय किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यात तालुका हल्लाकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार प्रल्हाद पवार , उत्तर विभागीय उपाध्यक्ष मनीष सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी, यांनी वारंवार प्रयत्न करून हा कार्यक्रम ग्रामीण भागातला दहा वर्षाच्या कालखंडात पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी पाचोरा व भडगाव परिसरातील सन्मानित पत्रकारांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे.

-------------------------

*हे होणार पुरस्काराने सन्मानित*


या कार्यक्रमात दैनिक प्रहार चे पाचोरा तालुका प्रतिनिधी, जेष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी व जेष्ठ पत्रकार सत्यजीत न्यूज चॅनल संपादक दिलीप जैन यांना (जीवनगौरव पुरस्कार) तर दैनिक प्रहार चाळीसगाव प्रतिनिधी सूर्यकांत कदम यांना (चाळीसगाव पत्रकार रत्न) तसेच पिंपळगाव, वरखेडी लोहारा परिसर वार्ताहर अशोक चौधरी (समाजरत्न) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे....................

Post a Comment

0 Comments