दि. 06 ऑगस्ट 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील मौजे शेवाळे येथे गट क्र. 255/1/अ संदर्भातील वहिवाट दावा क्र. 26/2025 मध्ये लोकअदालतीत तडजोड करण्यात आली. यामध्ये अर्जदार व सामनेवाले दोघेही वकीलांच्या समवेत उपस्थित होते. तसेच सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व अन्य शेतकरी यांचीही उपस्थिती होती.
अर्जदार श्री. विश्वास बाबुराव पाटील, रा. शेवाळे यांनी मामलेदार न्यायालयात कलम 5 अंतर्गत वहिवाट दावा दाखल केला होता. सदर प्रकरणात यापूर्वी स्थळ निरीक्षण झाले होते व दिनांक 31/07/2025 रोजी सुनावणी पार पडली होती. त्या दिवशी दोन्ही पक्ष तडजोडीस तयार असल्याचे निदर्शनास आल्याने, प्रत्यक्ष जागेवर लोकअदालत घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आजच्या लोकअदालतीमध्ये, सामनेवाले श्री. गणेश पाटील यांनी गट नं. 255 च्या पश्चिमेकडील बांधाच्या लगतून गेलेला रस्ता त्यांच्या शेतातून सुरू ठेवण्यास संमती दर्शवली. अर्जदार श्री. राजधर भगा पाटील यांच्या शेतजमिनीपासून पुढे दक्षिणेकडे जाणारा रस्ताही पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. संबंधित रस्त्याची मोजणी दोन्ही पक्षांनी स्वखर्चाने लवकरात लवकर करून घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला.
तडजोडीनुसार सद्यस्थितीत चालू असलेल्या रस्त्यावर कोणीही अडथळा निर्माण करू नये, असे स्पष्ट करण्यात आले. अडवलेला रस्ता पूर्ववत सुरू करत, खड्डा बुजवण्यात आला. यानंतर सर्व संबंधितांचे आभार मानून लोकअदालत संपविण्यात आली.
हा निर्णय गावात समाधानकारक ठरला असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर आता शांतता निर्माण झाली आहे.




Post a Comment
0 Comments