लोहारा तालुका पाचोरा प्रतिनिधी----येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत शिक्षण सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी,उपसरपंच दिपक खरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार, उपाध्यक्ष प्रल्हाद चौधरी,पत्रकार रमेश शेळके, दिलीप चौधरी, चंद्रकांत पाटील, प्रकाश सोनवणे, भगवान खरे यांच्या हस्ते निंब,पिंपळ, वड आदी ची लागवड करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत , उपशिक्षक तुकाराम पाटील, कृष्णा तपोने ,विलास निकम, भारती बोरसे,भारती पाटील, संध्या पाटील, नीता बडगुजर व विद्यार्थिनी हजर होत्या.

Post a Comment
0 Comments